Thursday, April 21, 2011

अमेरिकेचे बबलगम

“My preference would be that you don’t have to travel to Mexico or India to get cheap healthcare. I’d like you to be able to get it right here in the United States of America that is high quality.”

“Yes We Can” या घोषणेने साऱ्या जगावर मोहिनी घालणाऱ्या, अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या बराक ओबामांनी काल व्हर्जिनिया विद्यापीठात एका प्रश्नाच्या उत्तरादाखल वरील विचार व्यक्त केले. यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला हे वेगळे सांगयला नकोच. त्यांनी हे वक्तव्य विद्यार्थ्यांसमोर केलेले आहे ही वस्तुस्थिती सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही. अर्थात यामागची त्यांची भूमिका अमेरिकेच्या फायद्याचीच आहे आणि ती असायलाच हवी. परंतु त्यात आपल्या देशाचा संदर्भ आल्यावर त्यात लक्ष घालणे आवश्यक आहे.

जगाच्या अंताकडे चातकासारखी वाट बघत बसणाऱ्य आपल्याकडच्या दोन ‘अतिप्रसिद्ध’ न्यूज चॅनल्सनी याची दाखल घेणे अपेक्षित नव्हतेच (आणि त्यांनी ती घेतलीही नाही) Times Now या वाहिनीने ही बातमी प्रसिद्ध केली आणि आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया विचारली. “India does not provide cheap healthcare. India provides affordable healthcare. ‘Cheap’ is a cheap word and is cheap thinking.” त्यानंतर त्यावर कुठेही चर्चा झाली नाही. दैनिक सकाळ मध्ये एक बातमी आली होती पण ती इतकी मवाळ होती की त्याकडे कुणाचे लक्ष जाणेही अवघड होते.

आजच्या बहुसंख्य तरुणाईची जगण्यासाठीची मुलभूत गरज बनलेल्या (हवा, अन्न, पाण्यानंतर) फेसबुकवरही वातावरण शांत होते. नाही म्हणायला “Going home...Yipeee...”, “Got tickets for IPL match”, “Yesss... got tatkal tickets 2day”, “c dis vdo but dont dare laugh” अशा नेहमी दिसणाऱ्या वाक्यांची तिथे गर्दी होती. हेही अपेक्षितच होते. मी सुद्धा तिथे ही बातमी टाकली नाही. त्यावर एक दोन बेगडी comments आल्या असत्या, बाकी काही झालं नसतं. हा लेख ब्लॉगवर टाकूनही काही विशेष होणार नाही, पण असं काही झालंय हे काही थोड्या लोकांना समजेल. ओबामासारख्या जगप्रसिद्ध वक्त्याला ‘cheap’ ऐवजी ‘affordable’ किंवा इतर कुठला चपखल शब्द सुचला नसेल असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. कारण ‘cheap’ हा शब्दच चपखलरित्या वापरल्याचे ओबामाच्या एकूण अविर्भावातून आणि शेवटी वापरलेल्या ‘high quality’या शब्दातून स्पष्ट होते.

अमेरिकेत medical insurance नसणाऱ्या व्यक्तीचे काय हाल होतात हे जगजाहीर आहे. आपल्याकडेही थोड्याअधिक प्रमाणात आता हे लोण येऊ घातले आहे. अमेरिका हेच धोरण अवलंबत आहे ना मग ते योग्यच असणार, अशी आपली सर्वमान्य मानसिकता आहे आणि विशेष म्हणजे हेही जगजाहीर आहे. विस्टन चर्चिलचे एक प्रसिद्ध वाक्य आहे – “The Americans will always do the right thing...after they have exhausted all other alternatives”.

व्हिएतनाम, क्युबा, अफगाणिस्तान, इराकवर लादलेली युद्धे (यामागे दिलेली आणि न पटणारी पोकळ कारणमीमांसा), आर्थिक मंदी, सध्या लिबियात गद्दाफीविरोधी कारवाया... कमी अधिक प्रमाणात हेच सिद्ध करतात. चुका सुधारणे यात काहीही गैर नाही परंतु त्या सुधारताना आततायी, अनैतिक मार्गांचा अवलंब करणे हे विचित्र आहे. (अर्थात इतरांच्या दृष्टीने!)

भारत-अमेरिका संबंध, भारत-पाकिस्तान संबंध, भारत-चीन संबंध, याबाबतची अमेरिकेची भूमिका (जी कधीही स्पष्ट नसते आणि नसेलही) हे विषय आता बबलगम सारखे बनले आहेत. त्यांच्यातील रस केव्हाच संपला आहे. आता केवळ ते रबरसदृश्य बबलगम चघळत राहणे आणि अधूनमधून मजा म्हणून त्याचे फुगे फुगावणे आता शिल्लक राहिले आहे. असे बबलगम आपल्या दोघांच्याही स्वास्थ्यासाठी आवश्यक असल्यामुळे (अमेरिकेच्या दृष्टीने अधिकच!) ते थुंकून टाकता येत नाहीत इतकेच!

मला एकच प्रश्न पडलाय की त्या टाळ्यांच्या कडकडाटात सहभागी असणारे काही हात भारतीय विद्यार्थ्यांचे आणि तथाकथित भारतीय वंशाच्या व्यक्तींचेही (‘भारतीय वंशाची व्यक्ती’ ही आपल्याकडे फार सन्माननीय समजली जाणारी पदवी आहे!) असतील का?

Globalization, flat world, facebook च्या या काळात माझ्या विचारसरणीला बऱ्याच लोकांनी ‘संकुचित’, ‘बुरसटलेली’, ‘cheap’ विविध विशेषणे लावली तरीही मला फरक पडणार नाही कारण बबलगम खाणे मी बऱ्याच वर्षांपूर्वी सोडून दिलंय...
Video Link: YouTube
सकाळ मधली बातमी











2 comments:

  1. affordable हा शब्द अमेरिकनाना कळू शकला असता असे मला वाटत नाही.

    ReplyDelete
  2. If Indian Prime-minister tomorrow (not sure when?) says that "We do not want our people to visit USA for better treatment", USA will absolutely not care about it. And compare this to, tomorrow if Nepal says thto at we don't want our people to visit India to get medical treatment, will anyone in India care? And no one will even care that no one has cared. If we critize US so much, then why do we care what they say. I belive that people in India criticize US more than they do us (of course not publically), and US doesn't care.

    Now let's look at what US has done for India, (Or think of this like what if US wouldn't have been there), we have to agree that the considerable growth in Indian economy in past 20 years is mainly driven by IT and outsourcing. I agree that the work that we do in India in all those AC offices is not something we should proud of, however, if it would not have been for the outsourcing, thousands of young engineers in India would still be searching the jobs on street.

    Consider this, after breaking Russia in many pieces, who could have controlled Pakistan and eventually Taliban to cause more and more headache to us Probably we would have ended up giving Kashmir. Bristish have ruled us for just 150 years, But Moghal emporers did it for more than 500 years. (It is not represented in history for known reasons). Same Moghals can still rule us now in different ways.

    Every world power has ruled other weak nations in the history for resources. I do not want to justify them here, but I do not understand why US is targeted for that. At least it is doing good to India.

    Now coming back to 'cheap' word, I sincerely think that there is no 'cheap' meaning behind it. I have stayed here in US for about 4 years and have learned that there are many words used with different meaning. It is very common to use cheap for a lower price (and not lower quality). For instance, iPhone is musch cheaper than Blackberry. (Sorry couldn't come up with a better example)

    Again in these 4 years, I have liked and respected so many things about US (including many of them respect India, exceptions are always there everywhere).

    Concluding on the note that Yes, you are absolutely right about the Facebook rubbishness.!

    ReplyDelete